Ad will apear here
Next
विश्व मराठी परिषदेतर्फे विविध ऑनलाइन कार्यशाळा
विविध प्रकारच्या उपयुक्त कौशल्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या करिअर संधींची ओळख होण्यासाठी विश्व मराठी परिषदेच्या वतीने विविध ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषक समाजाला विविध प्रकारच्या व्यावसायिक संधी कळाव्यात व त्यासाठी आवश्यक कौशल्ये अवगत व्हावीत, या उद्देशाने या कार्यशाळा माफक शुल्कात आयोजित करण्यात आल्या आहेत.

कार्यशाळांचे विषय :
कथालेखन आणि कथाकथन, कविता लेखन आणि सादरीकरण, कॉपीराइट्स सुरक्षा आणि संरक्षण, ब्लॉगलेखन, अभिनय कौशल्ये, स्वरसंस्कार, पटकथा लेखन आणि वेबसीरिज लेखन, चित्रपट रसग्रहण, योग आणि योगोपचार, नाट्य लेखन : तंत्र आणि मंत्र, माहितीचा अधिकार, आर्थिक नियोजन, वैद्यकीय मदत कशी मिळवावी, निवृत्तीचे नियोजन, अभिजात नृत्य आणि जागतिक करिअर, ग्राहक संरक्षण कायदा, इत्यादी

विवेक वेलणकर, शमा भाटे, योगेश सोमण, प्रा. क्षितिज पाटुकले, राजन लाखे, नीलिमा बोरवणकर, अॅड. कल्याणी पाठक, प्रांजली फडणवीस असे अनेक मान्यवर या कार्यशाळांमधून मार्गदर्शन करणार आहेत. 

या कार्यशाळा ऑनलाइन होणार असून, घरबसल्याच सहभागी होता येणार आहे. चार ते पाच दिवस, दररोज रोज एक तास असे या कार्यशाळांचे स्वरूप आहे. कार्यशाळांसाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. या ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन पाच जूनपासून करण्यात येत आहे. अधिकाधिक संख्येने या कार्यकाळांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने अनिल कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यशाळांना यथोचित प्रतिसाद लाभावा अशी अपेक्षा विश्व मराठी परिषदेचे मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक माहितीसाठी : www.vishwamarathiparishad.org
प्रा. अनिकेत पाटील : ७५०७२ ०७६४५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZDRCN
Similar Posts
जगभरातील एक कोटी मराठी भाषकांचा आज कोविड-१९ महाजागर पुणे : कोविड-१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशांतून, अमेरिकेतील २१ राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यांतून एकाच वेळी अनेक मराठी भाषक एकत्र येत आहेत. २५ मे २०२० रोजी ते सोशल मीडियावर कोविड-१९च्या संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
कोविड-१९ : विश्व मराठी परिषदेतर्फे कथा, कविता लेखन स्पर्धा; रोख बक्षिसे पुणे : करोना या विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-१९ या अभूतपूर्व महामारीमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीशी दोन हात करता करता अनेक हात हे अनुभव कथा-कवितेच्या रूपाने शब्दबद्धही करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने जगभरातील मराठी भाषकांसाठी कथा-कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे
वैश्विक मराठी भाषकांचे पहिले ऑनलाइन संमेलन जानेवारीत विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. त्या संमेलनाची माहिती देणारा हा लेख...
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language